जय जय महाराष्ट्र माझा- इयत्ता सातवी मराठी

4801

जय जय महाराष्ट्र माझा

राजा बढे (१९१२-१९७७) :प्रसिद्ध कवी,लेखक,गीतकार,नाटककार,कादंबरीकार,कथाकथनकार.‘मािझया माहेरा
जा’,‘हसले मनी चांदणे’, ‘क्रांतीमाला,‘मखमल’ इत्यादी गीतसंगर्ह प्रसिद्ध ‘गीतगोिवंद’, ‘गाथासप्तशती’, ‘मेघदूत’
इत्यादी काव्यांचे अनुवादही प्रसिद्ध प्रस्तुत गीतातून कवीने महाराष्ट्राची थोरवी सांगितली आहे.
जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा ।।धृ.।।
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भिमा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ।।१।।
भिती न आम्हां तुझी मुळीही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला, जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गजर्तो, शिव शंभू राजा
दरीदरींतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ।।२।।
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्रयाद्राच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा ।।३।।

वरील महाराष्ट्र गीतांचा व्हिडीओ पहा.

माझा महाराष्ट्र थोर आहे.त्यांचा सदैव जयजयकार आसो.अशी गर्जना महाराष्ट्रातील लोक करतात.या महाराष्ट्राच्या भूमिरूपी रेवा,वरदा ,कृष्ण ,कोयना,भद्रावती,गोदावरी या नद्या आपले पवित्र पाणी एकतेने भारत आहे.या थोर महाराष्ट्राचे सैन्य भेट उत्तरेकडे जावून तट्टाना यमुनेचे पाणी पाजणार,असा हा महाराष्ट्र माझा आहे व त्याचा मला अभिमान आहे.
भारत देश महान-इयत्ता आठवी मराठी
आमच्या विरोधात कटकारस्थाने करणाऱ्या व विरोधात बोलणाऱ्याची आम्हाला मुळीच भीती वाटत नाही.गडगडणारे ढग आम्हाला घाबरवू शकत नाही.याना उउत्त्र देण्यासाठी आमच्या जीभाच पुरेशा आहेत.अशीच शिकवण सह्याद्रीच्या सिंह छत्रपती शिवराय यांनी आम्हाला दिली आहे.त्यांच्या शिकवणीच्या घोषणा दरीदरीतून घुमत आहेत.हा महाराष्ट्र माझा आहे.

या महाराष्ट्रातील माणसे रांगडी आहे

या महाराष्ट्रातील माणसे रांगडी आहे.त्यांच्या या काळ्या छातीवर महाराष्ट्राविषयी असलेल्या अभिमानाची लेणी कोरली आहेत.त्यांची मनगटे पोलादी आहेत.त्यामुळे ते जिवावरचा खेळखेळण्यास मागेपुढे पहात नाही.महारास्त्रातील लोक दारिद्र्याच्या उन्हात शिजतात,पण कष्ट करून ते निढळाचा घाम गळतात.भरपूर कष्ट करतात.पिढ्यानपिढ्या इथे देश गौरवासाठी लोक झिजले आहेत.दिल्लीच्या सिंहासानाचीही शान राखणारा असा महाराष्ट्र आहे.